Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेडीएस कुलकर्णींच्या घरी पोलिसांचे छापे

डीएस कुलकर्णींच्या घरी पोलिसांचे छापे

पुणे,: डीएस कुलकर्णी यांच्या घरी पोलिसांनी छापे मारले आहेत. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा डीएसकेंवर आरोप आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस डीएस कुलकर्णी यांच्या घरी पोचलेय. त्यांच्या विरोधात आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात चार आणि मुंबईत एका ठिकाणी  पोलिसांचे छापे  मिळाल्याची  माहिती मिळते आहे.पण छापे पडले तेव्हा डीएस कुलकर्णी घरी नसल्याची माहिती मिळते आहे. डी.एस कुलकर्णी हे पुण्यातलं बांधकाम व्यवसायातलं मोठं नाव आहेत. एकीकडे बिल्डर हा फसवणुकीशी समानार्थी शब्द झालेला असताना डीएसके मात्र प्रामाणिकपणा, सचोटी यामुळे कायम चर्चेत राहिले. जवळपास ३७ वर्ष त्यांनी बांधकाम क्षेत्रात मोठं नाव केलं. ऑटोमोबाईल, शिक्षण असे अनेक  व्यवसायही सुरू केलं, ते भरभराटीला ही आणले. डीएसकेवर पुणेकरांचा भरोसा होता. त्या आधारावरच जवळपास ८ हजार पुणेकरांनी त्यांची आपल्या आयुष्याची जमापुंजी फिक्स डिपॉजिट म्हणून गुंतवली. काहींनी गृहप्रकल्पामध्ये पैसे गुंतवले पण गेल्या १० महिन्यापासून डीएसकेंकडून  व्याज मिळत नव्हतं. या आणि अशा अधिक काही प्रकरणांमुळे त्यांच्यावर आर्थिक  फसवणूकीचा आरोप करण्यात आला. तसा गुन्हाही दाखल करण्यात आला. त्याचसंदर्भात पोलिसांनी हे छापे मारले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments