Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रराजकीय वादातून दिया जाईलकारची हत्या?

राजकीय वादातून दिया जाईलकारची हत्या?

चार दिवसांपूर्वी अपहरण झालेल्‍या  दिया जाईलकर या ८ वर्षीय चिमुरडीचा मृतदेह तिच्‍या घरापासून जवळच असलेल्‍या एका बंद घरात आढळून आला. राजकीय वैमनस्यातून चिमुकलीची हत्या झाल्याचा संशय आहे.

दिया घरगुती साहित्य आणण्यासाठी दुकानावर गेली होती, त्यानंतर ती घरी परतलीच नव्हती. बराच वेळ घरी न परतल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिचा जागोजागी शोध घेतला, पण दिया न सापडल्यामुळे अखेर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली दरम्यान, सोमवारी रात्री दियाच्या घरापासून जवळच असलेल्‍या एका बंद घरात तिचा मृतदेह आढळून आला.

दिया बेपत्ता झाली त्याच दिवशी गावात झालेल्या निवडणुकीत दियाची आई बिनविरोध निवडून आली. त्याच वादातून दियाचं अपहरण आणि हत्या झाल्याचा संशय आता वर्तवण्यात येत आहे.  या घटनेने संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली असून गावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला आहे. राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाली आहे का, ही बाब लक्षात घेऊन पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, दियाच्या हत्येच्या निषेधार्थ आज माणगाव, निजामपूर आणि लोणेरे गावातल्या बाजारपेठा  बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच मारेकऱ्याला तातडीने अटक करुन, त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments