होम मनोरंजन प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासरावच्या कारला भीषण अपघात

प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासरावच्या कारला भीषण अपघात

39
0

मुंबई: प्रसिध्द मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अभिनेता अनिकेत विश्वासराव एका भीषण अपघातातून सुखरुप बचावले आहेत. लोणावळा येथे एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या कारला अपघात झाला. त्यांच्या कारची अवस्था पाहिली तर हा अपघात किती भीषण होता ते लक्षात येते.

प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव कोल्हापूरला मस्का या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जात होते. गाडीमध्ये प्रार्थनाची सहाय्यक स्वाती आणि चालक असे चौघेजण होते. अनिकेत ड्रायव्हरच्या बाजूला बसला होता. तर प्रार्थना आणि स्वाती मागे बसले होते. लोणावळ्या जवळ आले असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि हा अपघात घडला.

प्रार्थना बेहरेच्या हाताला जबर दुखापत झाली असून अनिकेतला किरकोळ दुखापत झालेय. स्वातीच्या डोक्याला मार लागल्याचे समजते. जखमींवर उपचार करण्यात येत आहेत. अपघात स्थळी पोलीस दाखल झाले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यात येत आहे.