मुंबई : “लव्ह जिहाद” विरोधात मोर्चा; धर्मांतर विरोधी कायद्याची मागणी

सकल हिंदू समाजाने आयोजित केलेल्या 'हिंदू जन आक्रोश मोर्चा'च्या मध्ये आंदोलकांनी दादर येथील शिवाजी पार्कपासून आपल्या मोर्चाला सुरुवात केली.

- Advertisement -
Sakal Hindu Samaj protest march at MumbaiLove Jihad
Anti Conversion Law
Image: Twitter

“लव्ह जिहाद” विरोधात आणि राज्यात धर्मांतर विरोधी कायदा पारित करण्यासाठी सकल हिंदू समाजा आणि इतर उजव्या विचारसरणीच्या गटांनी रविवारी मुंबईतील दादर येथे विशाल निषेध मोर्चा काढला.

सकल हिंदू समाजाने आयोजित केलेल्या ‘हिंदू जन आक्रोश मोर्चा’च्या मध्ये आंदोलकांनी दादर येथील शिवाजी पार्कपासून आपल्या मोर्चाला सुरुवात केली आणि ४ किलोमीटरहून अधिक अंतर कापत परळच्या कामगार मैदानावर मोर्चाचा समारोप केला.

या निषेध मोर्चामध्ये लोक मोठ्या संख्येने भगवे झेंडे घेऊन दिसले, त्यांनी राज्यात “लव्ह जिहाद” आणि कथित धर्मांतरांविरुद्ध कायदा करण्याची मागणी केली.

- Advertisement -

यापूर्वी, सकल हिंदू समाजाच्या सदस्यांनी २२ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील पुण्यात “लव्ह जिहाद”, कथित बेकायदेशीर धर्मांतर आणि गोहत्या विरोधात आंदोलन केले.

 

Web Title: Protest march against Love Jihad in Mumbai

- Advertisement -