रेल्वेमंत्री पियुष गोयल दौऱ्यातून वगळल्याने खासदार सावंत नाराज

- Advertisement -

मुंबई – केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आज एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाची पाहणी केली. मात्र, या दौऱ्यातून स्थानिक खासदार अरविंद सावंत यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या दौऱ्यात रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी एल्फिन्स्टन रोडच्या पुलाचे निर्माण भारतीय लष्कर करणार असल्याची घोषणा केली. या पुलाच्या दुरूस्तीसाठी गेली तीन वर्षे सातत्याने प्रयत्न केला आहे. स्थानिक खासदार असूनही भाजपने आपल्याला डावलले असल्याचा आरोप खासदार सावंत यांनी केला आहे. मुख्यमंत्री कार्यालय तसेच रेल्वे प्रशासनानेही आपल्याला सूचित केले नसल्याचे सावंत यांनी सांगितले. भाजपकडून श्रेय लाटण्याचा हा घाणेरडा प्रकार केला गेला आहे, असेही त्यांनी म्हटले.

- Advertisement -