Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रबातमी पावसाची: मुसळधार पावसामुळे मुंबई व राज्यभर जिवनमान विस्कळीत

बातमी पावसाची: मुसळधार पावसामुळे मुंबई व राज्यभर जिवनमान विस्कळीत

मुंबई सह महाराष्ट्र भर शुक्रवार रात्री पासून पावसाने जोर धरला आहे. राज्यात काही जिल्हे वगळता सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबई व मुंबई-उपनगर मध्ये जोरदार पाऊस पडला असून ठीक ठिकाणी पाणी साचलेले आढळले. मुसळधार पावसाने मुंबईत सीएसएमटी ते वाशी रेल्वेसेवा बंद आहे. तर कल्याण आणि बदलापुरात रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्याने अंबरनाथपासून कर्जतकडे जाणारी लोकल वाहतूकही बंद आहे. पश्चिम रेल्वे ची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे.

नाशिक मध्ये गोदावरी नदीला पुर आला. दुतोंड्या मारुती  पूर्ण पाण्याखाली गेला आहे. त्याचप्रमाणे रामसेतू पूल देखील पाण्याखाली गेला आहे. पूर आल्या मुले रत्यावर गुडघा भर पाणी भरले आहे, तसेच भिवंडी मधील भातसा नदीवरील पुलपाण्या खाली गेल्या मुले शेजारील गावांचा संपर्क तुटला आहे.

राज्यातील अनेक प्रमुख धरणे १००% भरली आहेत. कोयना धरणातून २००० क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. मुंबई ला पाणी पुरवठा करणारा भातसा धरणातून सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. विदर्भा मध्ये जोरदार पाऊस पडला आहे त्यामुळे भंडारा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments