Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्र....आता ‘’बजायेंगे हम करोना के बारा’’; आठवलेंची कविता!

….आता ‘’बजायेंगे हम करोना के बारा’’; आठवलेंची कविता!

Shiv Sena should change role - Ramdas Athawaleमुंबई : रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले  यांचा गो करोना गो… गो करोना गो…. करोना गो… अशा घोषणा देणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आठवले यांनी पुन्हा एकदा करोनावर कविता केली आहे. या कवितेत ते थेट करोनाचे बारा वाजणार असल्याचं म्हणत आहेत.

‘करोना गो ये मैने दिया था नारा, इसलिए जाग गया भारत सारा, करोना जैसा चमक रहा है ११० देशों में तारा, एक दिन हम बजायेंगे करोना के बारा,’ अशी नवी कविता रामदास आठवले यांनी केली आहे. या कवितेतून करोना गेला पाहिजे असं सांगतानाच आपल्या गो करोनाच्या घोषणेमुळे मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली असल्याचं त्यांना कवितेतून सांगायचं आहे.

शिवाय या महाभयंकर आजाराने ११० देशांमध्ये हातपाय पसरल्याचं सांगत या आजाराचं गांभीर्यही त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला असून शेवटी करोनाचा आपण सर्व मिळून मुकाबला करणारच आणि शेवटी आपलाच विजय होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्ते केला आहे. प्रसारमाध्यमांना ही कविता ऐकवतानाच करोना गेलाच पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments