होम महाराष्ट्र बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला!

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उद्या ३० मे ला!

37
0
शेयर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे.

बोर्डाच्या www.mahresult.nic.in वेबसाईटवर हा निकाल जाहीर होईल.

राज्यातून १४ लाख ४५ हजार १३२ विद्यार्थ्यानी बारावीची परीक्षा दिली आहे. कला शाखेच्या ४ लाख ८९ हजार, विज्ञान शाखेच्या ५ लाख ८० हजार तर वाणिज्य शाखेच्या ३ लाख ६६ हजार विद्यार्थ्यानी परीक्षा दिली आहे.

बोर्ड ५ वेबसाईटवर हा निकाल उपलब्ध करुन देणार आहे. शिवाय SMS द्वारे मोबाईलवरही निकाल मिळू शकेल.
www.mahresult.nic.in

www.result.mkcl.org

www.maharashtraeducation.com

www.knowyourresult.com

www.hscresult.mkcl.org

दरम्यान, बारावी निकालाबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात होत्या. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांत गोंधळाच वातावरण निर्माण झाल होतं. मात्र, आता बोर्डाने निकालाची तारीख जाहीर केली आहे.