Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeदेशनेपाळचा हॉटेल मालक नाशिकमध्ये घरफोड्यासाठी आला अन् अडकला!

नेपाळचा हॉटेल मालक नाशिकमध्ये घरफोड्यासाठी आला अन् अडकला!

महत्वाचे…
१. नेपाळच्या पोखरा येथे त्याच्या मालकीचे दोन मोठे हॉटेल्स
२. रिसॉर्ट बांधण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने चोरी करण्यासाठी नाशिकमध्ये आला होता
३. तपासातून बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता


नाशिक: चोरट्याच्या मालकीचे दोन हॉटेल आहेत ते सुध्दा नेपाळ मध्ये. अन् चोरटा आहे नाशिकचा राहणारा. परंतु तो चोरटा नेपाळच्या महिलेशी लग्न करुन तिकडेच स्थायिक झाला. परंतु नवीन रिसॉर्ट उभारण्यासाठी पैसा कमी पडत असल्यामुळे नेपाळहून नाशिकला आला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला. हे एखाद्या चित्रपटात नव्हे तर ही घटना प्रत्यक्षात घडाली.

नाशिकमध्ये घरफोड्या करुन नेपाळमध्ये स्थायिक झालेल्या गणेश भंडारे या एका श्रीमंत चोराच्या मुसक्या आवळण्यात नाशिक गुन्हे शाखेला यश आले आहे. मूळचा सांगलीचा असलेल्या गणेशने नेपाळमधील एका महिलेशी लग्न केले असून, चोरी करण्यासाठी गणेश महाराष्ट्रात येतो आणि चोरीच्या पैशातून तो रिसॉर्ट उभारत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. नेपाळच्या पोखरा येथे त्याच्या मालकीचे दोन मोठे हॉटेल्स असून एक रिसॉर्ट बांधण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने चोरी करण्यासाठी तो नाशिकमध्ये येताच, नाशिक पोलिसांनी त्याला सीबीएस परिसरातून ताब्यात घेतले आहे. ३० ऑक्टोबर २०१६ रोजी नाशिकच्या टागोरनगरमध्ये घरफोडी करुन गणेश फरार झाला होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र तो नेपाळमध्ये लपून बसल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हता.

राज्य गुन्हे अन्वेषन विभाग पुणे यांच्यामार्फत गणेशला प्रत्यार्पण करण्यासाठी इंटरलपोलकडे प्रस्ताव देखील सादर करण्यात आला होता. गणेशला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता, ३ घरफोडीच्या गुन्ह्यात चोरलेला आणि मुंबईमधील एका सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करणाऱ्या दीपक पोखरकर या व्यावसायिकाला विक्री केलेला १३ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यामध्ये ५४७ ग्रॅम सोन्याचा समावेश असून दीपकला देखील अटक करण्यात आली आहे. गणेश भंडारेच्या इतर साथीदारांचा पोलीस सध्या शोध घेत असून, त्याने अशाच प्रकारे चोरीच्या पैशातून कुठे कुठे आणि किती संपत्ती गोळा केली आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. त्याचे बरेच कारणामे तपासात समोर येतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments