Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रफेरीवाल्यांकडून प्रशासनाला २ हजार कोटींचा हप्ता- राज ठाकरे

फेरीवाल्यांकडून प्रशासनाला २ हजार कोटींचा हप्ता- राज ठाकरे

डोंबिवली : ‘फेरीवाल्यांकडून प्रशासनाला तब्बल २ हजार कोटींचा हप्ता मिळतो.’ असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. डोंबिवली दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत हा धक्कादायक आरोप केला.

दरम्यान, यावेळी राज ठाकरेंनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. लोकांचा सत्ताधाऱ्यांवरुन विश्वास उडला आहे. तसेच खोट्या ‘अच्छे दिन’चा फुगाही लवकरच फुटेल. असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

फेरीवाल्यांकडून प्रशासनाला हजार कोटींचा हप्ता

‘मनसेमुळे रेल्वे स्थानकांनी मोकळा श्वास घेतला होता. पण पुन्हा एकदा फेरीवाले बसण्यास सुरुवात झाली. फेरीवाल्यांकडून प्रशासनाला २ हजार कोटींचा हप्ता मिळतो. त्यामुळेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना हटवलं तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात.’ असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

पैसे नसतानाही सरकारकडून योजनांच्या घोषणा

पैसे नसतानाही भाजप सरकार योजना जाहीर करण्याची लगीनघाई करत असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी यावेळी केला. तसेच कर्जमाफी, जीएसटी अशा अनेक मुद्यांवरुन राज ठाकरेंनी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

‘…तर गुजरातमध्ये भाजपच्या विजयात ईव्हीएमचा मोठा वाटा असेल

‘दरम्यान, गुजरात निवडणुकीबाबतही राज ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली.  ‘गुजरातमध्ये भाजपने जर १५० हून अधिक जागा मिळवल्या तर त्यामध्ये ईव्हीएम मशीनचा वाटा सर्वात मोठा असेल.’ असा गंभीर आरोपही राज ठाकरेंनी यावेळी केला.

राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :

: फेरीवाल्यांबाबतीत मनसेला जमलं, ते प्रशासनाला जमत नाही का? :: शेतकरी कर्जमाफी मूर्ख बनवण्याचं काम :

: फेरीवाले परत का बसले? हे प्रशासनाला विचारा :

: सर्व सुरळीत सुरु असताना जीएसटीचा घाट कशाला? :

: फेरीवाल्यांकडून प्रशासनाला 2 हजार कोटींचा हप्ता :

: मनसेमुळे रेल्वे स्थानकांनी मोकळा श्वास घेतला :

: पैसा नसतानाही सरकार योजना जाहीर करतं :

: भाजपवर टीका व्हायला लागल्यानं मुस्कटदाबी सुरु :

: खोट्या अच्छे दिनचा फुगा लवकरच फुटणार :

: गुजरातमध्ये भाजपने १५० हून अधिक जागा मिळवल्यास ईव्हीएम मशीनचा वाटा सर्वात मोठा असेल :

: लोकांचा सत्ताधाऱ्यांवरचा विश्वास उडला आहे :

: बेहरामपाड्यात बांग्लादेशी घुसखोर राहतात, तिथल्या बांधकामांवर कारवाई होत नाही

: पाकिस्तानी आणि बांगलादेशी आपण पोसत आहोत, त्यांना पायबंद घालण्याची कुणाची हिंमत नाही : राज ठाकरे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments