Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रशेतकऱ्यांच्या प्रश्नांवर 'या' दिवशी ग्रामीण भारत बंद

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ‘या’ दिवशी ग्रामीण भारत बंद

Raju Shettyमुंबई : केंद्रातील मोदी सरकारने शेतक-यांना दिलेले आश्वासन पाळले नाही. केंद्र सरकारने कृषी धोरण राबवत असताना दीडपट हमीभाव, वन जमिनीचे हस्तांतरण, प्रक्रिया उद्योगाला चालना व सरसकट कर्जमाफी यांपैकी कोणतेच आश्वासन पळालेले नाही. शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली. या विरोधात संपूर्ण देशात ८ जानेवारी रोजी ग्रामीण भारत बंद करण्यात येणार आहे, अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेटटी यांनी केली आहे.

कोल्हापूरात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्यावतीने देशातील २५१ शेतकरी संघटनांच्या तिस-या राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी शेट्टी यांनी हा निर्णय जाहीर झाला. काॅन्स्टिट्यूशन क्लब येथे आयोजित केलेल्या संमेलनात देशातील विविध राज्यातील संघटनांनी एकत्रित येऊन आपआपल्या राज्यातील शेतीक्षेत्रातील समस्यांची भूमिका त्यांनी मांडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments