“…मग तुमच्या काळात दहशतवादी कृत्य अन् खंडण्या वसूल करायला अधिकारी नियुक्त केले का?”

भाजप आमदार राम कदम यांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर पलटवार

- Advertisement -
sachin-vaze-case-bjp-attack-ncp-over-ambani-bomb-scare-news-updates
sachin-vaze-case-bjp-attack-ncp-over-ambani-bomb-scare-news-updates
मुंबई: राज्याच्या राजकीय वर्तुळात अंबानी स्फोटकं, मनसुख हिरेन मृत्यू आणि सचिन वाझे प्रकरणाचे पडसाद उमटत आहेत. वाझे प्रकरणावरून भाजपाकडून होत असलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्युत्तर देताना फडणवीसांनी अधिकारी नेमून मंत्र्यांवर पाळत ठेवल्याचा आरोप केला होता. या आरोपावरून भाजपाने पुन्हा राष्ट्रवादीवर पलटवार केला आहे.

“देवेंद्र फडणवीस यांनी माहिती महासंचालकपदावर पोलीस खात्यातील, त्यातही सायबर गुन्हे शाखेच्या ब्रिजेश सिंह यांना आणून आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर पाळत ठेवण्याचे उद्योग केले होते. तेच आता पोलीस अधिकाऱ्यांच्या गैरवापरावर प्रवचने झोडत आहेत,” अशी टीका राष्ट्रवादीने केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या टीकेला भाजपाचे आमदार राम कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप म्हणजे ‘शिळ्या कढीला ऊत’ आहे. एखादा अधिकारी आमच्या काळात नियुक्त झाला म्हणजे तो पाळत ठेवणारा आणि मग तुमच्या काळात काय दहशतवादी कृत्य करायला, खंडण्या वसूल करायला अधिकारी नियुक्त केले का?,” असा सवाल राम कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला केला आहे.
- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here