Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रपकोडा’ आंदोलनातून संजय निरुपमला अटक

पकोडा’ आंदोलनातून संजय निरुपमला अटक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांना रोजगारासंदर्भात भजी (पकोडा) तळण्याचा सल्ला दिल्यावरुन केलेल्या वक्तव्यावर देशभरातून टीका करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मुंबईत गिरगाव चौपाटीवर काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेल्या पकोडा निषेध आंदोलनात सहभागी झालेले काँग्रेसचे मुंबई शहराध्यक्ष संजय निरुपम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. एएनआयने यासंदर्भात ट्विट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात पकोड्याचा (भजी) ठेला सुरू करून बेरोजगारांनी रोजगार मिळवावा, असा सल्ला दिला होता. या विधानावरुन विरोधकांनी मोदींची खिल्ली उडवली होती. दरम्यान, अमित शहा यांनी राज्यसभेत विरोधकांचा समाचार घेतला होता. मोदींनी भजी विकून पैसे कमावण्याचा सल्ला दिला यावरुन काही लोकं टीका करतायंत. पण भजी विकणे ही लाजिरवाणी गोष्ट नाही. चहा विकणारा मुलगा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर भजी विकणाराही मोठी व्यक्ती होऊ शकते. भविष्यात भजी विकणाऱ्याची तिसरी पिढी या देशातील सर्वात मोठे उद्योजकही असू शकतात, असे त्यांनी सांगितले होते. भजी तळण्यात गैर काही नाही. पण मेहनतीने पैसे कमावणाऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी करणे गैर आहे, असे सांगत त्यांनी काँग्रेस खासदार पी. चिदंबरम यांना चिमटा काढला होता.

दरम्यान, रोजगार देण्यात अपयशी ठरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निषेध करण्यासाठी औरंगाबादचे तरुण गेल्या आठवड्यात रस्त्यावर उतरले होते. रस्त्यावर चक्क भजी तळून या तरुणांनी मोदींचा निषेध केला होता. त्यांच्या हातातील ‘नो जॉब नो जॉब, पकोडा शॉप पकोडा शॉप’ हा फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता.

वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचं स्वप्न मोदी यांनी तरुणांना दाखवलं होतं. मात्र प्रत्यक्षात जेव्हा नोकरी देण्याची वेळ आली तेव्हा मोदी पकोडा स्टॉल लावण्याचा सल्ला देतात. पकोडा स्टॉल लावणे हे काम करणं चूकीचे नाही. मात्र विद्यार्थ्यांनी मोठ्या परिश्रमाने अभ्यास करून वडिलांचा आर्थिक ताण सहन करत डिग्री मिळवली. त्यांची खिल्ली उडवण्याचे काम अशा वक्तव्यातून केलं जात असल्याची भावना या तरुणांनी व्यक्त केली. मोदींनी माफी मागावी किंवा आयटी कंपनीत रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी. तसेच सरकारी कार्यालयाच्या आवारात तरुणांना पकोडा सटॉल लावण्याची परवानगी देणारा आदेश काढावा अशी मागणीही या बेरोजगार तरुणांनी केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments