Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांवर हल्लाबोल; म्हणाले...

देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांवर हल्लाबोल; म्हणाले…

sanjay-raut-is-not-big-leader-that-i-should-answer-his-all-allegations-says-devendra-fadnavis-news-updates
sanjay-raut-is-not-big-leader-that-i-should-answer-his-all-allegations-says-devendra-fadnavis-news-updates

मुंबई: आज भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. फोन टॅपिंग प्रकरणामध्ये राज्यपालांनी लक्ष घालावं या मागणीसाठी यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरुनही प्रश्न विचारण्यात आले. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांसंदर्भातील प्रश्नांना उत्तर देताना, राऊत यांच्याकडे खूप वेळ असून त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याइतके ते मोठे नेते नाहीत असं मत व्यक्त केलं.

मुख्यमंत्र्यांना भेटण्याऐवजी भाजपाचे नेते राज्यपालांकडे जातात कारण राज्यपाल भाजपाचे कार्यकर्ते आहेत अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलीय, असा प्रश्न एका पत्रकाराने फडणवीस यांना विचारला.

यावर उत्तर देताना फडणवीस यांनी, “संजय राऊत यांच्याकडे खूप वेळ आहे. त्यांच्याकडे बातम्या नसतील तर तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहचता. संजय राऊत हे एवढे मोठे नेते नाहीयत की मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ.

राज्यपाल हे संविधानानुसार प्रमुख आहेत म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. आम्ही गेलो की ते (राज्यपाल) भाजपाचे नेते असतात आणि तुम्ही कंबरेमध्ये वाकून त्यांना नमस्कार करता तेव्हा ते कोणाचे नेते असतात?,” असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला.

बदली घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी भाष्य करण्याची गरज नाहीय असा बचाव सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय, असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला असता या प्रकरणावर बोलणं मुख्यमंत्र्यांना अडचणीचं ठरु शकतं असं मत व्यक्त केलं.

“त्यांनी माहितीय की या प्रकरणावर बोलणं कठीण आहे. बोललो तर या प्रकरणाचा तपास करावा लागेल, तपास करण्याचे आदेश द्यावे लागतील. हे सर्व त्यांना नाही करायचं आहे. आपलं सरकार वाचवण्यासाठी, हफ्तेखोरीला पाठीशी घालण्यासाठी हे केलं जात आहे.

संजय राऊत हे सरकारी व्यक्ती नाहीय. त्यांचं वक्तव्य हे अधिकृत वक्तव्य मानता येणार नाही. त्यामुळेच सरकारकडून कोण बोलत आहे ते सांगवं? आणि का बोलत नाहीत ते ही सांगावं,” अशी मागणी फडणवीस यांनी केली.

गेल्या काही आठवड्यांमध्ये राज्यामध्ये घडणाऱ्या घटना या चिंताजनक असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. “मुख्यमंत्र्यांचं या प्रकरणातील मौन ही सर्वात चिंताजनक गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांचं मौन हे घातक आहे.

शरद पवार यांनी दोन पत्रकार परिषदा घेऊन हा प्रकार पाठीमागे घालण्याचा प्रयत्न केला,” असंही फडणवीस म्हणाले. त्याचप्रमाणे, “काँग्रेस अस्तित्वातच नसल्यासारखं चित्र आहे. दिल्लीतील नेते वेगळे बोलतायत. इथले नेते वेगळं बोलतायत.

केवळ सत्तेसाठी हे सगळे एकत्र आहेत बाकी काही नाही,” असा टोला फडणवीसांनी काँग्रेसला लगावला. पुढे बोलताना फडणवीस यांनी काँग्रेसला सवाल विचारताना,  काँग्रेसला किती हिस्सा किंवा वाटा आहे असं म्हटलं आहे.

मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलतं केलं पाहिजे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्याप्रमाणे या बदली रॅकेटवर सरकारने काय कारवाई केली, हे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा ही आमची मागणी असल्याचं भाजपाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं आहे. १०० हून अधिक मुद्दे आम्ही राज्यपालांच्या निर्दर्शनास आणून दिल्याचं भाजपा नेत्यांनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments