Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रअज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर ठार

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर हा वन्य प्राणी जागीच ठार झाला. खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.

सकाळी महामार्ग पोलिसांच्या पथकाला पेट्रोलिंग करताना हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर या पथकाने वन विभागाला व पोलीस ठाण्यामध्ये याबाबत माहिती दिली. खोपोली पोलिसांनी या संबंधात अज्ञात वाहनाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments