Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्र२६ जानेवारीला मुंबईत 'संविधान बचाव रॅली'

२६ जानेवारीला मुंबईत ‘संविधान बचाव रॅली’

मुंबई – ‘संविधान बचाव, देश बचाव’ चा नारा देत २६ जानेवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया परिसरात रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जनता दल युनायटेडचे नेते शरद यादव, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सिताराम येचुरी, हार्दीक पटेल यांची उपस्थिती राहणार आहे.

काही महिन्यांपासून देशात घडणाऱ्या विविध घटनांमुळे देशाची राज्यघटना धोक्यात आली आहे. मात्र काहीही झाले तरी हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेप्रमाणेच चालेल हे ठामपणे सांगण्यासाठी ही रॅली निघणार आहे. ओव्हल मैदान येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून ही रॅली गेट वे ऑफ इंडिया परिसरातील ‌छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत निघेल.
या रॅलीसाठी एनडीएमधील काही घटक पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचे कळते. या रॅलीसाठी पोलिसांची परवानगी मागण्यात आली आहे. मात्र, पोलिसांनी अजून रॅलीला परवानगी दिलेली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments