Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रकमला मिल अग्नीतांडव प्रकरणी ७ आरोपींचा जामीन पुन्हा फेटाळला

कमला मिल अग्नीतांडव प्रकरणी ७ आरोपींचा जामीन पुन्हा फेटाळला

Bombay high court, kamala mill compound fire

मुंबई: कमला मिल कम्पाऊंड अग्नीतांडव प्रकरणी सात आरोपींचा जामीन अर्ज मुंबई विशेष सत्र न्यायालयाने पुन्हा फेटाळून लावला. यामध्ये मोजोस ब्रिस्टो पबचे मालक युग पाठक, वन अबव्ह पबचे मालक जिगर संघवी, क्रिप्रेश संघवी आणि अभिजीत मानकर, कमला मिल कम्पाउंडच्या मालकांपैकी एक असलेले रमेश गोवानी, कमला मिल कम्पाउंडचे डायरेक्टर रवी भंडारी आणि अग्निशमन दलाचे अधिकारी राजेंद्र पाटील यांचा समावेश आहे.

मात्र वन अबव्हचा मॅनेजर केविन बावा आणि लिस्बन लोपेज या दोघांना मात्र मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. जे घडलं ते अजाणतेपणी घडलं. पण ज्या परिस्थितीत हे पब्ज चालवले जात होते ते टाळलं असतं तर ही जीवितहानीही टाळता आली असती असं निरीक्षण यावेळी कोर्टानं नोंदवलं.
कमला मिल अग्नीतांडव प्रकरणी एमआररटीपी अंतर्गत कमला मिलचे मालक रमेश गोवानी यांना अटक करण्यात आली होती.  एमआरटीपी कायद्याचे उल्लंघन करणे, बेकायदेशीर कामास मदत करणे, मृत्यूस कारणीभूत होणे अशा विविध कलमांखाली रमेश गोवानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
मोजोस ब्रिस्टोचे संचालक युग पाठक, युग टुली, वन अबव्ह संचालक क्रिपेश संघवी, अभिजीत मानकर यांच्या विरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एमआरटीपी अंतर्गत पालिकेनं हा एफआयआर दाखल केला होता. तसेच आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या अग्निशमन दलाचे अधिकारी राजेंद्र पाटील यांनाही अटक करण्यात आली. २९ डिसेंबरच्या रात्री कमला मिल कम्पाउंड मधील वन अबव आणि मोजेस ब्रिस्टो या रेस्टोबारना लागलेल्या आगीत गुदमरून १४ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे. ना म जोशी मार्ग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  क्रिपेश संघवी, जिगर संघवी, अभिजित मानकर, युग टुली आणि युग पाठक यांच्यावर सदोष मनुष्यवध, बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा, दुसऱ्याच्या जीवितास कारणीभूत, अग्नी विरोधक यंत्रणेचा वापर न करणं यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments