Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रलातूर-नांदेड महामार्गावर अपघात सात ठार

लातूर-नांदेड महामार्गावर अपघात सात ठार

लातूर : लातूर-नांदेड महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात जणांचा मृत्यू झाला. १३ जण गंभीर जखमी झाले. लातूरपासून पाच किलोमीटर अंतरावरील कोळपा गावाजवळ पहाटे .३० हा अपघात झाला.

विजय पांदे, तुकाराम दळवे, उमाकांत कासले, मीना कासले, शुभम शिंदे, मनोज शिंदे आणि दत्तू शिंदे अशी मृतांची नावं आहेत. रेल्वे स्थानकावरुन आलेल्या प्रवाशांना घेऊन एक क्रूझर गाडी लातूरला येत होती. त्यात चालकासह दहा जण होते. या वाहनाने कोळपा गावाजवळील एका पुलाशेजारी उभ्या असलेल्या टेम्पोला समोरुन जोरात धडक दिली. याच वेळी समोरुन येत असलेल्या दुसऱ्या क्रूझर गाडीलाही धडक बसली. यात  क्रूझर छत पूर्ण फाटलं आणि गाडीचा चक्काचूर झाला. त्यातील सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. यासोबत दुसऱ्या क्रूझरमधील नऊ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments