Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रआरेतील मेट्रो कारशेडविरोधात शबाना आझमींचा पुढाकार

आरेतील मेट्रो कारशेडविरोधात शबाना आझमींचा पुढाकार

मुंबई: आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो ३च्या कारशेडविरोधात ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी एल्गार पुकारला आहे. या कारशेडसाठी आरे कॉलनीतील जवळपास ३५०० झाडे तोडली जाणार आहेत. म्हणून या विरोधात आवाज उठवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी आरे कॉलनीऐवजी कारशेडसाठी दुसरी जागा शोधण्याच्या मागणीसाठी आझमींनी एक मोहीमच सुरू केली आहे. यापूर्वी काही संघटनांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला पंरतु काही राजकीय मंडळींनी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता.

ट्विटरच्या माध्यमातून शबाना आझमी यांनी हा विरोध व्यक्त केला आहे. ‘आरे कॉलनीचे जंगल म्हणजे मुंबईची फुफ्फुसं आहेत. जर आपण आवाज उठवला नाही तर मेट्रो कारशेडसाठी या जंगलातील ३५०० झाडं तोडली जातील. मुख्यमंत्री फडणवीस आणि मुंबई मेट्रो रेल्वे कोर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांना दुसरी जागा शोधण्यास सांगा. या मोहीमेत सहभागी होण्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या- ०८०३०६३०९५९,’ असे ट्विट त्यांनी केले आहे.

कुलाबा ते सीप्झदरम्यान धावणाऱ्या मेट्रो ३ मार्गातील आरे कॉलनीतील हरितपट्टयाची जागा हा वादाचा विषय आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ असा ३३ किलोमीटरचा हा मुंबईतला पहिलाच भुयारी मेट्रो प्रकल्प आहे. मात्र, या प्रकल्पामुळे गिरगाव, दादर भागातील लोक विस्थापित होतील आणि कारशेडमुळे आरे कॉलनीतल्या झाडांची हानी होईल असा दावा केला जात आहे. आरे कॉलनीत झाडं वाचवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments