शरद पवार पंतप्रधान होणं अशक्य नाही- प्रफुल्ल पटेल

- Advertisement -

कर्जत: येत्या काळात शरद पवार देशाचं पंतप्रधान होणं अशक्य नाही असं आश्वासक विधान राष्ट्रवादीचे नेते  प्रफुल्ल पटेल म्हणाले.   यंदाची गुजराथ निवडणुक भाजपसाठी कठीण झाल्याचं वक्तव्यही  प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे. ते राष्ट्रवादीच्या चिंतन सभेत बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचं दोन दिवसांचं चिंतन शिबिर आज कर्जतमध्ये सुरू आहे. प्रफुल्ल पटेल यांनी नरेंद्र मोदींवर याच सभेत जोरदार हल्ला केला. नोटबंदी, जीएसटीमुळे वातावरण बदललंय, लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय गुजरातमध्ये भाजपची परिस्थिती कठीण होऊन बसलीय. एकेकाळी देशात मोदींची लाट होती, पण आता तसं चित्र राहिलेलं नाही, असं पटेल म्हणाले. तसंच शरद पवार आणि नरेंद्र मोदींची तुलना केली असता शेतकरी शरद पवारांना प्राधान्य देतील असंही त्यांनी सांगितलं. तसंच गुजरात मॉडेल स्टेट म्हणून दाखवतात पण त्याच गुजरातमध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती फार वाईट आहे असंही त्यांनी सांगितलं. तसंच याच्यापुढच्या काळात राष्ट्रवादीला भरपूर मेहनत घ्यावी लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. या सभेत शरद पवारांचं भाषण उद्या होणार आहे. या शिबिरामुळे तरी राष्ट्रवादीतली मरगळ झटकली जाईल, अशी आशा पक्ष नेतृत्वाला आहे.

- Advertisement -