Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रभारताच्या महिला संघाच्या पराभवानंतर शरद पवारांनी केले कौतुक

भारताच्या महिला संघाच्या पराभवानंतर शरद पवारांनी केले कौतुक

मुंबई : महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताला ८५ धावांनी पराभूत केले. पण या पराभवानंतरही आयसीसी आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी महिला संघावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. भारतीय संघाचे भवितव्य उज्वल आहे, अशा शुभेच्छाही पवार यांनी भारतीय महिला संघाला दिल्या आहेत.

भारतीय संघ महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीती पोहोचला, पण त्यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. पण या विश्वचषकाच्या साखळी फेरीत भारतीय संघाने एकही सामना गमावला नव्हता. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे साखळी फेरीच्या पहिल्याच सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. पण अंतिम फेरीत मात्र ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत पाचव्यांदा विश्वचषकाला गवसणी घातली.

भारतीय संघ महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला, पण त्यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे भारतीय संघ पारभूत होण्याच्या मार्गावर आहे. पण या अंतिम फेरीचा एक टर्निंग पॉइंट ठरला आहे. त्यामुळेच भारताला हा सामना गमवावा लागला असे म्हटले जात आहे.

ऑस्ट्रेलिया नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय हिलीने आपल्या आक्रमक फलंदाजीने योग्य असल्याचे दाखवून दिले. सलामीवीर एलिसा हिलीने हा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले. कारण हिलीने यावेळी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सर्वात जलद अर्धशतक झळाकावण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. आतापर्यंत झालेल्या पुरुषांच्या आणि महिलांच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही.

Dr. Vaidehi
Dr. Vaidehihttp://www.vaidehisachin.com
न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टींग कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या आठ वर्षापासून समूह संचालक आहेत. इंग्रजी दैनिक आफ्टरनून व्हॉईस, मराठी दैनिक मुंबई माणूस, मुंबई माणूस मराठी वेब पोर्टल च्या राजकीय पत्रकार कार्यरत आहेत. संशोधक पत्रकार, हॅकर्स म्हणून उत्तमप्रकारे काम केले आहेत. त्यांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments