Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रसेक्स वर्कर महिलांचा NRC ला विरोध, शरद पवाराचीं घेतली भेट

सेक्स वर्कर महिलांचा NRC ला विरोध, शरद पवाराचीं घेतली भेट

Sharad Pawarमुंबई : केंद्र सरकार आणू पाहात असलेल्या CAA आणि NRC कायद्याला देशभरातील अनेक समूह विरोध करत आहेत. आता महाराष्ट्रातील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांनीही NRC लागू करण्यात येऊ नये, अशी मागणी केली आहे. तसंच या मागणीला पाठिंबा मिळावा, यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे.

‘आम्ही आमची कागदपत्रे कुठून आणणार? आमच्या मुलांचे वडील म्हणून कुणाचे नाव देणार? आमच्याकडे कुठलीही कागदपत्रे नाहीत. त्यामुळे सरकारने NRC कायदा आणू नये,’ अशी मागणी वेश्याव्यवसायातील महिलांनी केली आहे. तसंच या मुद्द्यावरून शरद पवार यांचीही भेट घेतली आहे.

केंद्र सरकारच्या सीएए आणि एनआरसी या कायद्यांना देशभरातून होत असलेला विरोध अजूनही कायम आहे. रोज कुठे ना कुठे मोर्चे निघत आहेत. आंदोलनं होत होत आहेत. मुंबईमध्ये सुद्धा CAA, NRC आणि NPR ला विरोध करण्यासाठी सर्व धर्मीयांनी शनिवारी तीव्र विराट मोर्चा काढला होता. आझाद मैदानात हा मोर्चा काढण्यात आला. जवळपास 67 संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या. यामध्ये मोठ्या संख्येनं आंदोलक सहभागी झाले होते.

मोर्चामध्ये तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले. मात्र या मोर्चामधील महिलांची संख्या लक्षणीय होती. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात मोठ्या संख्येनं महिला रस्त्यावर उतरल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments