शेकापचे ज्येष्ठ नेते भाई एस.एम.पाटील यांचे निधन

- Advertisement -

पुणे |  शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माढ्याचे माजी आमदार भाई एस.एम.पाटील (वय ९२) यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यातील बिर्ला रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शेकापच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली. अभ्यासू नेते म्हणून त्यांचा राज्यात नावलौकिक होता. सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय योगदान होते. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्षपद त्यांनी सांभाळले होते. शेतकरी, सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी धडपडणारा नेता अशी त्यांची ख्याती होती. रयत शिक्षण संस्थेचे ते उपाध्यक्ष होते.

भाई एस.एम.पाटील हे १९६७ मध्ये माढा तालुक्याचे आमदार म्हणून निवडून आले होते. गेल्या ४० वर्षांपासून ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होते. आज सांयकाळी सातच्या सुमारास त्यांचे मूळ गाव वरवडे (ता. माढा) येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

- Advertisement -