Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रनक्षल्यांच्या मदतीने कोरेगाव भीमा दंगल आंबेडकरांनीच घडवली!

नक्षल्यांच्या मदतीने कोरेगाव भीमा दंगल आंबेडकरांनीच घडवली!

Sambhaji Bhide, Mumbai, Prakash Ambedkar

मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी संभाजी भिडे यांच्यावर लावलेल्या आरोपांच्या निषेधार्थ आज राज्यभरात शिवप्रतिष्ठानातर्फे मोर्चे काढण्यात आले आहेत. या घटनेशी भिडे यांचा काहीच संबंध नाही, असा दावा शिवप्रतिष्ठान करत आहे. त्यासाठी हजारो कार्यकर्ते हातात भगवे झेंडे घेऊन रस्तावर उतरले आहेत. दरम्यान, प्रकाश आंबेडकरांवर नक्षलवाद्यांच्या मदतीने कोरेगाव भीमा येथे हिंसाचाराचा कट रचल्याचा आरोप केला जात आहे.

कोरेगाव भीमा हिंसाचार हा भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नक्षलवाद्यांच्या माध्यमातून घडवलेला पूर्वनियोजित कट होता. सरकारने शिवप्रतिष्ठाच्या मागण्यांची दखल न घेतल्यास विधानभावनावर धडक देऊ, अशा इशारा सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानकडून राज्य सरकारला देण्यात आला आहे.
या महामोर्चाला राज्यातील विविध समाज आणि पक्ष संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. सांगलीसह मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, यवतमाळ, जळगाव, नाशिक, गोंदिया, महाड, सिंधुदुर्ग, बेळगाव आणि पणजीमध्ये भिडे गुरुजींच्या सन्मानार्थ एकाच वेळी बुधवारी सकाळी १० वाजता मोर्चे काढण्यास सुरुवात झाली आहे. कोरेगाव भीमा येथील हिंसाचारावरून भिडे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. या गुह्यांतून दोषमुक्त करून शासनाने त्यांचा सन्मान करावा, अशी त्यांची मागणी आहे. शिवप्रतिष्ठानतर्फे या मोर्चाला सन्मान मोर्चा असे नाव देण्यात आले आहे. त्यासाठी मुंबई आणि पुण्यात या मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतरही भिडे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा फौडफाटा तैनात आहे.
मुंबई…

या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. दरम्यान आझाद मैदानात भिडे समर्थकांनी जमायला सुरुवात केली आहे. भिडे गुरुजींवर सर्व आरोप खोटे असून या प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांना अटक करण्याची मागणीही या समर्थकांनी यावेळी केली. तसेच फक्त स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी आणि सत्य दडपण्यासाठी संभाजी भिडे यांना जाणिकपूर्वक लक्ष केले जात असल्याचा आरोप यावेळी मोर्चेकऱ्यांनी केला आहे.
पुणे…

पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर शनिवार वाड्याजवळ असणाऱ्या नदीपात्रात भिडे समर्थक एकवटले. हे सर्व गुन्हे राजकीय हेतूने दाखल करण्यात आल्याचे भिडे याचे समर्थक सांगत आहेत. नदीपात्राजवळ पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. दरम्यान, माझ्या मुलाला न्याय मिळालाच पाहिजे. त्याच्या आरोपींना कठोर शिक्षा करा, अशी मागणी कोरेगाव भीमा हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्या राहुल फटांगळे याच्या आईने केली.
सांगली

संभाजी भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठानने पुकारलेल्या सन्मान महामोर्चाला शहरात सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातून हजारो शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले असून अवघी सांगली नगरी भगवीमय झाली आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नागपूर

कोरेगाव भीमा दंगल घडवणाऱ्यांना अटक करण्याची मागणी शिवराज्याभिषेकच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. संभाजी भिडे यांना समर्थन देण्यासाठी नागपूरच्या महाल परिसरातील शिवाजी पुतळ्याजवळ हिंदुत्त्ववादी संघटनांनी हा मोर्चा काढला होता.
अमरावती…

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, अमरावती विभागाच्यावतीने आज भिडे यांच्या सन्मानार्थ महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. इर्विन चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा महामोर्चा काढण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments