शिवसेना-काँग्रेस कार्यकर्त्ये एकमेकांत भिडले

- Advertisement -

मुंबई : युवक काँग्रेसच्या वतीने महागाईविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं. त्याचवेळी हा राडा झाला. शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा मुंबईतल्या चेंबुरमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. पोलिसांनी लावलेले बॅरिगेटिंग तोडून शिवसैनिकांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी बाचाबाची केली.

महागाई विरोधात युवक काँग्रेसतर्फे चेंबुरमध्ये आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे शिवसैनिकांनी पोलिसांनी लावलेली बँरिगेटींग तोडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची केली.

या किरकोळ बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झालं. यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करुन गर्दी पांगवली. सध्या या परिसरात कार्यकर्ते असले तरी तणावपूर्ण शांतता आहे.

- Advertisement -
- Advertisement -