Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रस्थानिक स्वराज्यसंस्थेत शिवसेना भाजपमध्ये चुरस!

स्थानिक स्वराज्यसंस्थेत शिवसेना भाजपमध्ये चुरस!

ठाणे – अंबरनाथ पंचायत समिती निवडणुकीत भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. अंबरनाथ पंचायत समितीवर शिवसेने भगवा फडकला आहे. ८ पैकी ६ जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीने जिंकल्या. यामध्ये शिवसेनेला ४ तर राष्ट्रवादीला २ जागांवर विजय मिळाला. या पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपला खातेही उघडता आले नाही.

अंबरनाथ – 
राज्यात भाजप शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, अंबरनाथ पंचायत समितीमध्ये भाजपला शह देण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन निवडणूक लढवली. त्याचा त्यांना फायदाही झाला आहे. अंबरनाथ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४ जागा आहेत. त्यातील २ जागांवर शिवसेना तर १ जागेवर भाजपाला विजय मिळाला. अंबरनाथ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वाडी गटातून शिवसेनेच्या सुवर्णा राऊत विजयी झाल्या.
अंबरनाथ पंचायत समितीसाठी चोंण गणातून शिवसेनेच्या स्वप्नाली भोईर विजयी झाल्या आहेत. नेवाळी जमिन बचाव आंदोलनाचे अध्यक्ष चैनू जाधव यांच्या पत्नी तेजस्विनी जाधव या शिवसेनेच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत. त्याच प्रमाणे आसनगाव गटात भाजपला जोरदार धक्का देत सेनेच्या मधुकर चंदे यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. भाजपच्या भगवान चंदे यांचा २३ मतांनी निसटता पराभव झाला आहे.
जिल्हा परिषद ठाणे –
जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या ५ पंचायत समित्यांसाठी बुधवारी मतदान पार पडले. त्या निवडणुकीच्या मतमोजनीला आज सुरुवात झाली आहे. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. या मत मोजणीमध्ये शिवसेनेने खाते उघडले आहे.
शहापूर जिल्हापरिषद गट- शिवसेना ४, एक राष्ट्रवादी
शहापूर पंचायत समिती गणात – शिवसेना – ४, राष्ट्रवादी – ४ आणि भाजप -१
नगरपरिषद आणि नगरपंचायती
त्याचप्रमाणे विविध जिल्ह्यांमधील ६ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतींच्या सदस्य पदांसाठी आणि अध्यक्षपदासाठीही बुधवारी मतदान झाले. त्यामध्ये
अमरावती 
चिखलदरा नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा, भाजपचा दारुण पराभव
अमरावती – जिल्ह्यातील चिखलदरा नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या विजया सोमवंशी ह्या विजयी झाल्या आहेत. विजया सोमवंशी यांनी भाजपच्या दुर्गा चौबे यांचा ३०० मतांनी पराभव केला. नगराध्यक्षपदासाठी २ तर १७ नगरसेवकांसाठी ४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
धुळे – 
जिल्ह्यातील सिंदखेडा नगरपंचायतीसाठी झालेल्या मतदानाचे हाती आलेला निकालामध्ये भाजपने ९ , काँग्रेसला ६ तर सपाला- २ जागा मिळाल्या आहेत. भाजपचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी अनिल वानखेडे या ३हजार २०० मताहून अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत.
कोल्हापूर-
हुपरी नगरपपरिषद अंतिम निकाल जाहीर
नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या जयश्री गाठ या विजयी झाल्या आहेत. यामध्ये नगरसेवक पदासाठी
हुपरी नगरपालिकेचा ९ प्रभागांपैकी ६ प्रभागांचा निकाल जाहीर
भाजप – ६, ताराराणी आघाडी – ४ आणि मनसे – २ जागा
किनवट नगरपरिषदेवर भाजपची बाजी
नांदेड – किनवट नगरपरिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाले त्यामध्ये नगराध्यक्षपदाची माळ भाजप उमेदवाराच्या गळ्यात पडली आहे. एकून जागापैकी भाजपने – ९, राष्ट्रवादी – ५, काँग्रेस – २, आणि अपक्षला १ जागा मिळाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments