नाणार प्रकरणी शिवसेना आमदार साळवींना अटक

- Advertisement -

Rajan Salviरत्नागिरी: रिफायनरी विरोधी तीव्र आंदोलनाप्रकरणी लांजाचे  शिवसेना आमदार राजन साळवी यांना अटक करण्यात आली आहे. नाणार रिफायनरीच्या विरोधात राजन साळवी यांनी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता. मनाई आदेशाचा भंग केल्यामुळे  गुरुवारी राजापूर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. 

नाणार रिफायनरीला शिवसेना,मनसे,स्वाभीमानी पक्ष यांनी विरोध केल्यामुळे सरकारची चांगलीच पंचाईत झाली आहे. नाणार प्रकल्पाला स्थानिकांचाही विरोध असल्यामुळे हा प्रकल्प अडचणीत सापडला आहे. नाणार प्रकल्पाला सरकारने हट्ट धरल्यास सरकारचा टेकू शिवसेना काढू शकते. यामुळे भाजपा अडचणीत आला आहे.

राजन साळवी यांच्यासह पंचायत समिती सभापती सुभाष गुरव, उपसभापती अश्विनी शिवणेकर, तालुका प्रमुख प्रकाश कुवळेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -
- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here