Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेनेच्या अरविंद सावंतांचा मंत्रीपदाचा राजीनामा

शिवसेनेच्या अरविंद सावंतांचा मंत्रीपदाचा राजीनामा

arvind sawant
सत्तास्थापनेच्या वादानंतर शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेतला. आता शिवसेना दिल्लीतील सत्तेतूनही एनडीएममधूनही बाहेर पडणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचे केंद्रीयमंत्री अरविंद सावंत आपल्या मंत्रीपदाचा आज राजीनामा देणार आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरेंच्या आदेशानुसार सावंत हे राजीना देतील असं खासदार संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितलं.

लोकसभेपूर्वी ठरलेल्या फॉर्म्युलानुसार मुख्यमंत्रीपदासह सत्तेच समसमान वाटप व्हावं, या मागणीवर ठाम राहिलेल्या शिवसेनेनं अखेर एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेनं राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याच पहिल पाऊल म्हणजे मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री असलेले शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. सावंत यांनी ट्विट करून आपण राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments