शिवसेनेचे भंडाऱ्याचे जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले भाजपात

- Advertisement -

भंडारा: शिवसेनेचे भंडाऱ्याचे नाराज जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले यांनी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. त्याआधी त्यांनी शिवसेना भंडारा जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर येथे राजेंद्र पटले यांनी भाजपात अधिकृत प्रवेश करून शिवसेनेनेला जय महाराष्ट्र केला आहे. महत्वाचं म्हणजे नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर भंडारा-गोंदिया मतदारसंघात लोकसभा पोटनिवडणूक होत आहे. त्याच वेळी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने अखेर त्यांनी भाजपात प्रवेश करून शिवसेनेला धक्का दिला आहे.

- Advertisement -

राजेंद्र पटेल यांचा भाजपला तुमसर विधानसभा मतदारसंघात फायदा होईल आणि त्याचीच जोड लोकसभेतही होणार आहे. भंडाऱ्यात पोवार समाजाचा दबदबा असल्याने त्यांचा फायदा भाजपला आगामी निवडणुकीत होणार असल्याचे समजते.

- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here