- Advertisement -
मुंबई: मुंबईतील ‘शिव वडापाव स्टॉल’ ला कोणतीही परवानगी नसून ते स्टॉल अनधिकृत असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत केला. फेरीवाला विरुध्द मनसे असा राडा सध्या सुरु आहे.
काँग्रेसने फेरीवाल्यांच्या सन्मानार्थ दादर येथे बुधवारी मोर्चाचे आयोजन केले होते. या मार्चामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी बटाटे फेकले. या प्रकरणावरुन काँग्रेस कार्यकर्ते विरुध्द मनसेचे कार्यकर्ते असा राडा झाला. हे प्रकरण अजून तापण्याची शक्यता आहे. मुंबई शहर परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त असून सरकारने यामध्ये हस्तक्षेप केले नाही तर हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. निरुपम यांनी केलेल्या आरोपामुळे शिवसेना विरुध्द निरुपम असा वाद घडू शकतो.
- Advertisement -