Friday, March 29, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रअहमदनगरशिवसैनिक हत्याकांड: भाजपा आमदार शिवाजी कर्डिलेंना अटक!

शिवसैनिक हत्याकांड: भाजपा आमदार शिवाजी कर्डिलेंना अटक!

shivaji kardile, ahamadnagar

अहमदनगर : शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे हत्याकांड प्रकरणी भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांना पोलिसांनी अटक केली आहे. भिंगार पोलिसांनी सोमवारी एप्रिल रोजी सकाळी ही कारवाई केली आहे. रविवारी पोलिसांनी  आमदार कर्डिले यांचे जावई राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना अटक केली होती. आज कर्डिले यांना खूनाचा कट रचणे व पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोडप्रकरणी अटक करुन गुन्हा दाखल आहे.

शनिवारी ७ एप्रिल संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास केडगाव येथील सुवर्णनगर येथे भर चौकात संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या करण्यात आली. संजय कोतकर व वसंत ठुबे हे दोघे केडगाव येथील सुवर्णनगर परिसरात एकत्र होते. याचवेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर संतप्त शिवसैनिकांनी सुवर्णनगर येथे दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली होती. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर संतप्त जमावाने पोलीस वाहनांवरही दगडफेक केली.

दरम्यान, यापूर्वी या हत्याकांडप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. तर तसेच  पोलीस अधीक्षक कार्यालयात धुडगुस घालून तोडफोड केल्याप्रकरणी आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दादाभाऊ कळमकर, नगरसेवक कैलास गिरवले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन अरुण जगताप, नगरसेवक कुमार वाकळे, माजी नगरसेवक निखील वारे, अभिजित कळमकर, बाबासाहेब गाडळकर, राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे यांच्यासह अडीचशे ते तीनशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी २२ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

कोणाकोणाचा आहे समावेश?

या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप, भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, माजी महापौर संदीप कोतकर, भानुदास कोतकर यांच्या सांगण्यावरुन  विशाल कोतकर, औदूंबर कोतकर, बाळासाहेब कोतकर, संदीप गुंजाळ, रवी खोलम, अशोक कराळे, नवनाथ कराळे, मोहसीन शेख, विजय कराळे, रमेश कोतकर, शरद जाधव, संदीप गिर्हे, दादा येणारे, विनोद लगड, मनोज कराळे, मयूर राऊत, वैभव वाघ, शरद लगड, स्वप्नील पवार, संकेत लगड, बाबासाहेब कोतकर, राजू गंगड, अप्पा दिघे, बाबूराव कराळे यांच्यासह पाच ते सहा जणांनी कट, कारस्थान करून संजय कोतकर व वसंत ठुबे यांना गोळ्या घालून व कोयता तलवारीने मारल्याचे या फिर्यादीत म्हटले गेले आहे.

कोणत्या पक्षाचा कोण आमदार, कोण कुणाचा नातेवाईक
संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, तर त्यांचे वडील अरुण जगताप राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर आमदार आहेत. संग्राम यांचे सासरे शिवाजी कर्डिले भाजपचे आमदार आहेत. कर्डिले यांची कन्या आमदार संग्राम यांची पत्नी आहे, तर कर्डिलेंची दुसरी कन्या सुवर्णा या माजी उपमहापौर असून माजी महापौर संदीप कोतकर यांची पत्नी आहेत. कोतकर यांची कन्या आमदार अरुण जगताप यांची सून आहे.
राजकारण अबाधित ठेवण्यासाठी हाडवैर असलेल्या तिघांनी सोयरीक केली, मात्र राजकारणमुळे अशोक लांडे हत्येनंतर पुन्हा हे संकटात सापडले आहेत. लांडे हत्या प्रकरणी कर्डिले यांनीही तुरुंगवास भोगला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments