Friday, March 29, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रअहमदनगरशिवसैनिक हत्याकांड: आमदार संग्राम जगतापसह इतरांच्या कोठडीत वाढ

शिवसैनिक हत्याकांड: आमदार संग्राम जगतापसह इतरांच्या कोठडीत वाढ

अहमदनगर : केडगाव येथील शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या हत्याप्रकरण पोलीस कोठडीत असलेल्या आमदार संग्राम जगताप, बी. एम. कोतकर, बाळासाहेब कोतकर, यांच्या कोठडीत दोन दिवसांची तर मुख्य आरोपी संदीप गुंजाळ याच्यासह बाबासाहेब केदार यांना तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.

संग्राम जगताप यांच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी १६ एप्रिल रोजी संपत असल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. दुपारी जगताप यांना न्यायालयात आणण्यात आले. त्यांच्यासह बी. एम. कोतकर, बाळासाहेब कोतकर, संदीप गुंजाळ, बाबासाहेब केदार या आरोपींनाही न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी संग्राम जगताप यांच्यासह सर्वांच्याच पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी न्यायालयाकडे केली. पोलिसांची मागणी मान्य करीत न्यायालयाने आमदार संग्राम जगताप, बी. एम. कोतकर, बाळासाहेब कोतकर यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली. त्यामुळे १८ एप्रिलपर्यंत जगताप यांचा पोलीस कोठडीतील मुक्काम कायम राहणार आहे. तर मुख्य आरोपी असलेल्या संदीप गुंजाळ याच्यासह बाबासाहेब केदार याच्या पोलीस कोठडीत १९ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments