Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेनेची आर्थिक मंदीवरून डबल ढोलकी

शिवसेनेची आर्थिक मंदीवरून डबल ढोलकी

मुंबई : शिवसेना केंद्रात आणि राज्यात भाजपासोबत सत्तेत आहे. मात्र आर्थिक मंदीवरून शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाना साधला. मंदीमुळे बेरोजगारी उसळेल लोक भूक भूक करत रस्तावर उतरतील त्यावेळी त्यांना गोळ्या घालणार का असा सवाल उध्दव ठाकरेंनी त्यांच्या मुखपत्रातून मोदींना केला. शिवसेना आणि भाजपा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका एकत्र लढणार आहेत. शिवसेना सत्तेत असून आर्थिक मंदीवरून मतांसाठी मोदींना टार्गेट करून डबल ढोलकी का वाजवत आहे. असा सवाल उपस्थितीत होत आहे.

शिवसेनेने त्यांच्या मुखपत्रातून देशातील आर्थिक मंदीवरून मोदींना आणि भाजपाला कोंडीत पकडले. गणेशाच्या आगमनाने विघ्न दूर होतील अशी आशा होती, पण देशाच्या अर्थव्यवस्थेचे विघ्न काही दूर होताना दिसत नाही. उलट चिंतेत भर पडत आहे. आर्थिक मंदीवरुन कितीही उलटे सुलट सांगितले तरी डॉ. मनमोहनसिंग यांनी सांगितलेल्या सत्याचा स्फोट झाला अशा कानपिचक्या भाजपाला दिल्या. आर्थिक मंदीचे राजकारण करू नये एक्सपर्टच्या मदतीने देश सावरावा असे आवाहन मनमोहनसिंग या शहाण्या माणसाने केले आहे. त्यांचा हा सल्ला गांभीर्याने घेण्यातच राष्ट्राचे हित आहे. असा सल्लाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसेनेने दिला.

मोदी यांनी त्यांच्या मंत्र्यांना तंबी दिली होती. ज्या घोषणा पूर्ण करता येणार नाही त्या करू नका. याचा अर्थ घोषणा करू नका, लोकांना आशेला लावू नका, पण अशा मोठ्या घोषणांचे फटाके फोडायला सुरुवात कुणी केली. असा उलट सवाल शिवसेनेने मोदींना केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments