Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्र...मजा आता है! शिवसेनेने ट्विटरवरुन भाजपाला डिवचले

…मजा आता है! शिवसेनेने ट्विटरवरुन भाजपाला डिवचले

Sanjay Raut, Shiv Sena, Uddhav Thackeray
मुंबई : शिवसेना भाजपात सत्तासंघर्षाला बारा दिवस उलटले आहेत. शिवसेना दररोज भाजपावर आरोपांच्या फैरी झाडत आहे. आज पुन्हा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘लक्ष्य तक पहुंचने से पहेले सफर में मजा आता है’! असं ट्विट करुन भाजपला डिवचले.

शिवसेना भाजपामध्ये ५०-५० च्या सुत्रामुळे भाजपा आणि शिवसेनेमध्ये सत्ता स्थापनाचा पेच कायम आहे. यावरून तोडगा निघण्यासाठी भाजपा पुढाकार घेताना दिसत नाही. यामुळे शिवसेनेने भाजपाला लक्ष केले आहे. शिवसेनेच्या जागा कमी झाल्यामुळे भाजपने दगाबाजी केली याचा राग शिवसेनेच्या मनात आहे. त्यामुळे शिवसेनेने ‘हीच ती वेळ’ म्हणून भाजपला सत्तास्थापनेपासून लांब ठेवून आडकाठी आणली आहे.

शिवसेनेचे नेत खासदार राऊत दररोज आक्रामक भुमिका मांडताना दिसत आहे. प्रसारमाध्यमांसमोर येऊन बोलण्याबरोबरच राऊत ट्विटवरुनही रोज एखादे ट्विट करुन भाजपाला टोला लगावता दिसत आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेले असतानाच राऊतांनी प्रवास करण्यावरुन ट्विट करत एक टोला लगावला आहे.

संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांचा आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकत्र चालताना फोटो आहे. या फोटोला त्यांनी “जय हिंद” असे कॅप्शन दिले आहे. या फोटोवर ‘लक्ष्य तक पहुंचने से पहले सफर में मजा आता है’ असे वाक्य लिहिलेले आहे. यावरून भाजप काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments