Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि शिल्पकार भाऊ साठेंची ‘ग्रेट भेट’

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि शिल्पकार भाऊ साठेंची ‘ग्रेट भेट’

मुंबई: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी गुरुवारी सदाशिव साठे शिल्पप्रतिष्ठानला भेट दिली. यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार सदाशिव उर्फ भाऊ साठे यांनी बाबासाहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याची प्रतिकृती भेट दिली. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे ६० वर्षांपूर्वी उभारेला शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती अश्वारूढ पुतळा साठे यांनी उभारला होता. याच पुतळ्याची ही छोटी प्रतिकृती आहे. आंतरराष्ट्रीय किर्तीचे शिल्पकार भाऊ साठे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विनंतीवरुन अवघ्या सहा महिन्यात हा पुतळा उभारला होता.

यावेळी बाबासाहेबांनी साठेंचे भरभरुन कौतुक केले. ते म्हणाले की, याक्षणी नेमकं काय बोलावं यासाठी मला शब्द आठवावे लागतायत अशी मनस्थिती झाली आहे. मी माझ्या ७० वर्षांच्या आयुष्यामध्ये शेकडो व्याख्याने दिलेली आहेत, पण अशी मनस्थिती कधी झाली नाही. माझ्या आयुष्यामध्ये अविस्मरणीय माणसं आणि व्यक्ती आल्या, त्यामध्ये श्रीमंत भाऊसाहेब साठे यांचे स्थान उच्चस्थानी आहे. ते उत्तम शिल्पकार आहेत हे जगाला माहित आहे. पण मी त्यांना यापेक्षाही उच्च स्थान देतो. ते एक उत्तम दर्जाचे रसिकही आहेत. त्यांच्यासारखी रसिकता सध्याच्या घडीला फारच क्वचित पाहायला मिळते. त्यांची रसिकता सुक्ष्म असल्याचा अनेकदा अनुभव घेतलाय, असेही बाबासाहेबांनी यावेळी सांगितले.

साठे यांनी साकारलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातील वेगळेपणाबद्दल ते म्हणाले की, हातामध्ये तलवार घेतलेले शिवाजी महाराजांचे पुतळे सर्वत्रच आहेत, पण अटकेकडे तोंड करुन या मार्गाने चला असा संदेश देणारा शिवाजी महाराजांचा हा एकमेव पुतळा आहे, असे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments