Placeholder canvas
Tuesday, April 16, 2024
Homeमहाराष्ट्रधक्कादायक : महाराष्ट्राच्या सुवर्णपदक विजेत्याची आत्महत्या!

धक्कादायक : महाराष्ट्राच्या सुवर्णपदक विजेत्याची आत्महत्या!

PRANAV RAUT, boxer, suicide, अकोला : महाराष्ट्राचा सुवर्णपदक विजेता बॉक्सर प्रणव राऊत (२२) याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज शुक्रवार (२१ फेब्रुवार ) उघडकीस आली आहे. प्रणवने अकोल्यातील शास्त्री स्टेडियम जवळच्या क्रीडा प्रबोधनीत आत्महत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दिल्लीत जानेवारी महिन्यात झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रणवने सुवर्णपदक जिंकले होते. आज सकाळी ९ : ३० च्या सुमारस प्रणव रुम मधूनबाहेर आला नाही म्हणून त्याच्या मित्रांनी दरवाजा ठोठावला. पण तो आतून बंद होता. अनेक वेळा आवाज देऊन देखील तो दरवाजा उघडत नसल्याने मित्रांनी दरवाजा तोडला. तेव्हा प्रणवने गळफास घेतल्याचे समोर आले.

आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात…

प्रणव कोणत्याही तणावात किंवा दबावात नसल्याचे मित्रांनी आणि प्रशिक्षकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. वयाच्या २२ व्या वर्षी प्रणवने अचानक टोकाचे पाऊल का उचलले याचा सर्वांना धक्का बसला आहे. प्रणवच्या आत्महत्येमुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments