Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रवेश्या व्यवसाय करणारी ६ कंपन्यांची बनली मालकीन!

वेश्या व्यवसाय करणारी ६ कंपन्यांची बनली मालकीन!

मुंबई:  पोट भरण्यासाठी तिच्‍यावर वेश्‍या व्‍यवसाय करणाऱ्याची वेळ आली होती. आज ती एक- दोन नव्हे तर तब्बल कंपन्‍यांची मालकीन आहे. एवढेच नाही तर तिने लिहिलेले पुस्‍तकही खूप लोकप्रिय झाले आहे. पुस्तकाच्या विक्रीने विक्रमही केला आहे. या महिलेचे नाव आहे डेनी जॉनसन.

डेनी जॉनसन हे रिलेशनशिप मार्केटिंगमधील एक प्रसिद्ध नाव आहे.  या शिवाय ती लेखक, वक्‍ता आणि अर्थ सल्‍लागार आहे. आपल्‍या कंपनीच्‍या माध्‍यमातून ती लोकांना कॉरपोरेट ट्रेनिंग देते.  फोर्ब्‍स मासिकानेही डेनीवर कव्हर स्‍टोरी केली होती  एके दिवशी नशेत धुंद होऊन ती आपल्‍या कारमध्‍ये झोपण्‍यासाठी आली. त्‍यावेळी तिला कारमध्‍येच तिने विकत घेतलेले एक पुस्‍तक दिसले. त्‍यातूनच तिला वजन कमी करण्‍याबाबत पुस्‍तक लिहावे, असे सूचले. ती की कल्‍पना प्रत्‍यक्षात साकारही केली. याच पुस्‍तकाने तिची कमाई सुरू झाली. पुढे तिने स्‍वत:च्‍या कंपन्‍याही सुरू केल्‍या. डेनी जॉनसन हे रिलेशनशिप मार्केटिंगमधील एक प्रसिद्ध नाव आहे.  या शिवाय ती लेखक, वक्‍ता आणि अर्थ सल्‍लागार आहे. आपल्‍या कंपनीच्‍या माध्‍यमातून ती लोकांना कॉरपोरेट ट्रेनिंग देते.  फोर्ब्‍स मासिकानेही डेनीवर कव्हर स्‍टोरी केली होती. फोर्ब्‍सच्‍या मुलाखतीत डेनीने सांगितले, तो काळ माझी परीक्षा पाहाणाराच होता. त्‍या दोन महिन्‍यांत मी नशेतच होती. या काळात ८ वेगवेगळ्या पुरुषांसोबत मी शरीर संबंधही ठेवले. ते यासाठीच की आपल्‍या दोन वेळच्‍या जेवणाची सोय लागावी असेही तीने सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments