Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादऔरंगाबाद हिंसाचारामध्ये काही पोलीस आणि पोलीस अधिकारी गंभीर जख्मी

औरंगाबाद हिंसाचारामध्ये काही पोलीस आणि पोलीस अधिकारी गंभीर जख्मी

औरंगाबाद : औरंगाबाद हिंसाचारामध्ये अनेकजन जख्मी झाले अणि लाखोंच नुकसान झाल आहे. अचानक उफाळलेल्या औरंगाबादच्या हिंसाचारात काही पोलीस जखमी झालेत. यात शहर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांचाही समावेश आहे. शनिवारपासून कोळेकर हे बेशुद्धावस्थेत आहेत. त्यांच्या गळ्याला आणि स्वरयंत्राला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच, पोलीस निरीक्षक हेमंत कदम आणि राजश्री आढेही जखमी झालेत. कदम यांच्या गालावर दगड पडल्याने ते जखमी झाले. तर, राजश्री यांचा पाय फ्रॅक्चर झालाय. 

काल संध्याकाळी मोतीकारंजा परिसरात काही किरकोळ कारणांवरुन दोन गटात वाद झाले. या वादात दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत जाळपोळ केली. दुकानांबाहेरील कूलर, गाड्यांची तोडफोडही करण्यात आली. राजा बाजार भागात जवळपास 25 दुकाने जाळण्यात आली. या घटनेत आतापर्यंत 30 ते 40 जण जखमी झाले आहेत.

औरंगाबाद हिंसाचारानंतर शहरातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात अजूनही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. अफवा पसरु नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबादमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. अजूनही ही सेवा खंडित आहे.

पोलिसांनी औरंगाबाद शहरातील परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. मात्र, आता या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उडवली असून, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची तसेच, या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. सरकारवर टीकेची तोफ डागताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यानी औरंगाबाद हिंसाचारामागे सत्ताधाऱ्यांचे राजकारण असल्याचा आरोप केलाय. तसंच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणीही मुंडेंनी केलीय. ते लातूरमध्ये बोलत होते. गृहखात्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments