Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रपहिलं राफेल उडवण्याचा मान मराठवाड्यातील सौरभ अंबुरेला

पहिलं राफेल उडवण्याचा मान मराठवाड्यातील सौरभ अंबुरेला

 Sourabh Ambure from Marathwada honored to fly the first rafale aircraft
पहिलं राफेल विमान उडवण्याचा मान लातूरच्या मराठमोळ्या पठ्ठ्याला मिळाला आहे. उदगीरचे स्क्वॉड्रन लीडर सौरभ अंबुरे यांनी ऐतिहासिक गगनभरारी घेतली. यामुळे मराठवाड्याच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला गेलाय.

सौरभ अंबुरे यांनी फ्रान्समध्ये राफेल विमानातून गगनभरारी घेत पहिलं राफेल विमान उडवलं. वायुसेनेने फोटो शेअर केला असून यामध्ये सौरभ अंबुरे राफेल विमानासोबत दिसत आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर पहिलं राफेल विमान भारताच्या ताब्यात मिळालं. शत्रूला धडकी भरवणाऱ्या राफेलमध्ये बसून अंबुरे यांनी जुलै महिन्यातच पहिल्यांदा झेप घेतली होती. भारत आणि फ्रान्समध्ये झालेल्या युद्धाभ्यासावेळी लढाऊ विमान अंबुरे यांनी उडवलं.

फ्रान्सने बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत RB 001 राफेल हे विमान भारताला सोपवलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये या विमानातून पहिली भरारी घेतली. दसऱ्याला शस्त्रपूजेची परंपरा असल्यामुळे राजनाथ सिंह यांनी लढाऊ विमानाची पूजा केली. राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्येही भारतीय परंपरा दाखवत, राफेल विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवत विमानावर ओम काढलं. मात्र यामुळे राजनाथ यांना मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments