Placeholder canvas
Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्रएसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे गणवेश पहिल्यांदाच बदलणार!

एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे गणवेश पहिल्यांदाच बदलणार!

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने महामंडळाची स्थापना झाल्यापासून प्रथमच गणवेशाबाबत पाऊल उचलले आहे. कर्मचाऱ्यांचे गणवेश बदलण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली. जानेवारी  रोजी मुंबई सेंट्रलमधल्या मुख्यालयाबरोबरच महाराष्ट्रातील एसटीच्या ३१ विभागीय कार्यालयात कर्मचाऱ्यांना नवीन गणवेश वितरण सोहळा होणार आहे. यावेळी नाविन्यपूर्ण योजनांचं सादरीकरण कार्यक्रम होणार आहे.

गेल्या ७० वर्षात एसटीच्या गणवेशाबाबत कोणीच गांभीर्याने विचार केला नव्हता. एसटी महामंडळात सुमारे एक लाख कर्मचारी काम करतात. त्यांना दरवर्षी एसटी महामंडळाकडून गणवेशासाठी कापड दिलं जायचं. ते कापड पसंत ‘न’ पडल्यामुळे कर्मचारी आपल्या सोयीने गणवेशाचे कापड खरेदी करुन गणवेश स्वतः शिवून घेत.

हे सर्व कर्मचारी एका रांगेत उभे राहिले, तर नेमका गणवेशाचा खाकी रंग कोणता? हे ओळखणे अवघड होत असे. साहजिकच एकाच पदावर काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्याच्या गणवेशामध्ये रंगापासून शिलाईपर्यंत वैविध्य दिसून यायचं. अर्थात यातून गणवेशाची एकसंधता निघून जाते, असं रावते म्हणाले.

रावते यांनी पहिल्यांदाच एसटीतील सर्व कर्मचाऱ्यांना तयार गणवेश देण्याची संकल्पना मंडली. केवळ संकल्पना मांडून ते थांबले नाहीत, तर केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या ‘राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजि संस्थान’ (National Institute of Fashion technology ‘NIFT’) या संस्थेला एसटी कर्मचाऱ्यांचे नवीन गणवेश ‘डिझाईन’ तयार करण्यासाठी पाचारण केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments