एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्याचं आवाहन धुडकावलं

राज्यात एसटीची कर्मचारी संख्या १ लाख ७ हजार असून, एसटी बसची संख्या १७ हजार आहे. एसटीच्या आगारांची संख्या २५८, विभागीय कार्यालयांची संख्या ३१ आहे.

- Advertisement -

मुंबई: सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले परंतु प्रशासनाचे आदेश कर्मचाऱ्यांनी धुडाकवले.

- Advertisement -

या संपात  मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेसह सहा संघटना सहभागी आहेत. दिवाळी सणाला सुरुवात झाल्याने ऐन दिवाळीच्या हंगामात होत असलेल्या या संपाने एसटी प्रशासनाची कोंडी होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या भूमिकेमुळे राज्यातील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. मात्र सरकारने याकडे गांभीर्याने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने कर्मचारी विरुध्द सरकार असा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

- Advertisement -