Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रनवी मुंबईत कोचिंग क्लासमध्ये शिक्षकाचा तरुणीवर बलात्कार

नवी मुंबईत कोचिंग क्लासमध्ये शिक्षकाचा तरुणीवर बलात्कार

navi mumbai rape
नवी मुंबई : नवी मुंबईतील एका खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षकाने कर्मचारी तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. आठवड्याभरानंतर दुसऱ्या शिक्षकानेही पीडितेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर दोन्ही आरोपी पसार झाले आहेत. या प्रकारामुळे पालकांमध्येही एकच खळबळ उडाली.

खारघरमध्ये खाजगी क्लासेसमध्ये एक तरुणी सुपरवायझरचं काम करत होती. येथील शिक्षकाने क्लासमध्येच सुपरवायझरचं काम करणाऱ्या तरुणीने शिक्षकावर बलात्कार केल्याचा आरोप केला. घरच्या परिस्थितीमुळे आणि आरोपींना घाबरुन दोन दिवस पीडित तरुणीने आपल्या कुटुंबीयांकडे घडलेल्या प्रकाराविषयी कुठलीच वाच्यता केली नव्हती. अखेर पीडित तरुणीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराविषयी पोलिसांकडे सर्व आपबीती
सांगितली.

पीडित तरुणीने खारघर पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments