दहा नगरसेवक ‘राज’ला म्हणाले ११२ला भारी

- Advertisement -

डोंबिवली : आम्ही मागून वार करणारे नाही, आमचे नेते आणि अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आमचा १० नगरसेवकांचा गट महापालिकेत ११२ला भारी आहे, असे सांगत कल्याण-डोंबिवली महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी राज ठाकरेंवर पूर्ण विश्वास आहे, असे स्पष्ट केले.

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील मनसे नगरसेवकांनी दिली राज ठाकरे यांना एकजूट अभेद्य ठेवण्याची ग्वाही. आमच्याशी शिवसनेकडून कुठलाही संपर्क नाही. शिवसेनेने आमच्याशी संपर्क तर करावा, मग दाखवूण. आमचा १० नगरसेवकांचा गट असला तरी केडीएमसीमध्ये ११२ जणांना तो भारी आहे. आम्ही कुणालाही भीक घालणार नाही. आम्ही मागून वार करणारे नाही, आमचा राज ठाकरे यांच्यावर संपूर्ण विश्वास, असे सांगितले.

- Advertisement -

राज ठाकरे यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे उत्साह वाढल्याचा नगरसेवकांनी दावा केलाय. यावेळी नगरसेवकांनी महापालिकेच्या कारभाराविषयी माहिती दिली तसेच रखडलेली कामेही कानावर घातलीत. त्यामुळे राज ठाकरे आता पुढची दिशा काय ठरवतात, याकडे लक्ष लागलेय.

- Advertisement -