Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रठाण्यात भिडे, एकबोटेंच्या अटकेसाठी दलित पॅंथरचा रेल रोको!

ठाण्यात भिडे, एकबोटेंच्या अटकेसाठी दलित पॅंथरचा रेल रोको!

मुंबई/सांगली- भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी ठाण्यात दलित पॅंथरच्या कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकात काही वेळ ठाणे-सीएसटी लोकल रेल्वे रोखून धरली. दहा-पंधरा जणांच्या पॅंथर कार्यकर्त्यांनी हा प्रकार केला. यातील पाच-सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी आंदोलकांनी जयभीमच्या घोषणा देत प्रकाश आंबेडकर यांनी आरोप केल्यानुसार, संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना तत्काळ अटक करावी अन्यथा यापुढेही परिस्थिती बिघडवू अशी धमकी या कार्यकर्त्यांनी दिली. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत ठाण्यात नेले.

….सांगलीत संभाजी भिडेंच्या समर्थनात मोर्चा

दरम्यान, कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे हे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केल्यानंतर या दोघांविरोधात पिंपरीत गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर दलित संघटनांकडून भिडे व एकबोटे यांच्या अटकेची मागणी होत असताना तिकडे सांगलीत भिडेंच्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते एकटवले. या कार्यकर्त्यांनी संभाजी भिडेंचा या हिंसाचाराशी कसलाही संबंध नाही असे सांगत त्यांच्याविरोधातील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. गुन्हे मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलन करू असे सांगत सांगली जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक यांना निवेदन दिले आहे. यावेळी हजारोंच्या संख्येने धारकरी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments