Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रआरोपींची सुटका झाल्यामुळे फिर्यादीचा भोईवाडा न्यायालयात आरोपींवर चाकूहल्ला

आरोपींची सुटका झाल्यामुळे फिर्यादीचा भोईवाडा न्यायालयात आरोपींवर चाकूहल्ला

महत्वाचे…
१.न्यायाधीशांसमोरच तक्रारदाराने दोन आरोपींवर जीवघेणा हल्ला केला. २. न्यायालयात सुरक्षा रक्षकांनी चाकू नेणाऱ्याला तपासले नाही ३. हल्ला करणाऱ्या तक्रारदाराला पोलिसांनी अटक केली


मुंबई : मुंबईतील भोईवाडा न्यायालयात तक्रारदाराने आरोपींवर चाकू हल्ला केला. धक्कादायक म्हणजे, न्यायाधीशांसमोरच तक्रारदाराने दोन आरोपींवर जीवघेणा हल्ला केला. आरोपींची सुटका झाल्यामुळे फिर्यादीने हल्ला केल्याची घटना समोर आली.

मारहाणीच्या प्रकरणात तीन आरोपींना भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आले होते. ज्यावेळी आरोपींना कोर्टाने जामीन मंजूर केला, त्यावेळी तक्रारदाराने आपल्या हातातील चाकूने तीनपैकी दोन आरोपींवर हल्ला केला. या घटनेत दोन्ही आरोपी जखमी झाले असून, त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर आहे. दरम्यान, हल्ला करणाऱ्या तक्रारदाराला पोलिसांनी अटक केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments