Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रअकरावीची दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून

अकरावीची दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून

मुंबई l अकरावीची दुसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया गुरुवार (२६ नोव्हेंबरपासून) सुरु होणार आहे. 11 class admission मराठा आरक्षित जागांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना खुल्या गटात प्रवेश देण्यात येईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. त्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरु करू नये अशी मागणी करण्यात आली होती. दरम्यान विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान थांबविता येणार नाही.

SEBC मधून अ‍ॅडमिशन घेता येणार नाही, त्याऐवजी खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेता येईल, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा l मराठी माणूस तुमच्या छाताडावर पाय ठेवून उभा राहील;संजय राऊतांचा भाजपला इशारा

ज्या विद्यार्थ्यांनी ९ सप्टेंबर २०२० पूर्वी एईसीबीसी प्रवर्गातून प्रवेशासाठी अर्ज केले असतील परंतू त्यांना प्रवेश देण्यात आले नसतील अशा एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात यावे हा शासन निर्णय अंतरिम स्थगिती उठवण्याच्या अर्जाच्या अंतिम निकालापर्यंत लागू राहिल. निर्णयाची अमलबजावणी सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी तातडीने केली पाहिजे

सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर २०२०-२१ शैक्षणिक वर्षातील ९ सप्टेंबर २०२० नंतरची सर्व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया एसईबीसी वर्गाकरिता आरक्षित न ठेवता पार पाडण्यात येणार आहेत.

हेही वाचा l लालू प्रसाद यादव यांचे ‘हे’ षडयंत्र मोदींनी केले उघडकीस

ज्या विद्यार्थ्यांनी ९ सप्टेंबर २०२० पूर्वी एईसीबी प्रवर्गातून प्रवेशाकरिता अर्ज केले असतील, परंतू त्यांना प्रवेश दे ण्यात आले नसतील अशा एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार असल्याचंही ठाकरे सरकारने म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments