Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपाने अखेर डॉन छोटा राजनच्या भावाची उमेदवारी बदलली

भाजपाने अखेर डॉन छोटा राजनच्या भावाची उमेदवारी बदलली


शिवसेना-भाजपा महायुतीवर डॉन छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजे यांच्या उमेदवारीवरुन टीका झाली होती. त्यामुळे दीपक निकाळजेंची उमेदवारी रद्द करण्यात आली. या प्रकारामुळे महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपाइंमध्ये नाराजी पसरली आहे.

रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक निकाळजे यांना बुधवारी फलटणमधून उमेदवारी जाहीर झाली होती. त्यांच्या जागी आता दिगंबर आगाव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाला भाजपने सहा जागा सोडल्या आहेत. आठवले यांनी त्यापैकी चार मतदारसंघांतील उमेदवार जाहीर केले होते.

महायुतीमधील घटक पक्ष रिपाइंला या मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये मानखुर्द-शिवाजीनगरमधून पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आमदार मोहन फड (पाथरी)राजेश पवार (नायगाव)अरविंद भालाधरे (भंडारा) व डॉ. विवेक गुजर (माळशिरस) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र दीपक निकाळजे यांची उमेदवारी रद्द केल्यामुळे कार्यकर्ते महायुतीच्या विरोधात काम करण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments