Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रशिवबंधनात अडकलेले 'ते' नगरसेवक आपली बाजू मांडणार!

शिवबंधनात अडकलेले ‘ते’ नगरसेवक आपली बाजू मांडणार!

मुंबई: मनसेतून शिवसेनेत गेलेले मुंबईतले सर्व सहा नगरसेवक आज कोकण आयुक्तांकडे वकिलांमार्फत आपली बाजू मांडणार आहेत. नगरसेवक फोडल्या प्रकरणात या नगरसेवकांचं काय म्हणणं आहे ते नगरसेवकांनी वकिलांना लेखी स्वरूपात दिलं आहे.

ही लिखित बाजू आज कोकण आयुक्तांपुढे मांडली जाणार आहे. मनसेनं या नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द करावं अशी याचिका कोकण आयुक्तांकडे केली होती. ही याचिका कोकण आयुक्तांनी मान्य केली होती. याच याचिकेसंदर्भात या सहा नगरसेवकांचं काय म्हणणं आहे ते आज वकिलांमार्फत मांडणार आहेत. दरम्यान हे नगरसेवक महानगरपालिकेच्या कुठल्याच महत्त्वाच्या बैठकांना उपस्थित राहत नव्हते. त्यामुळे आता याप्रकरणी त्यांचे नगरसेवकपद राहते की रद्द होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.तसंच या साऱ्याचे महानगरपालिकेत काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. चार नगरसेवक मनसेत परतणार अशाही वावड्या उठल्या होत्या. परंतु ते सहा नगरसेवक शिवसेनेतच राहणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकाव्दारे जाहीर केले आहे. यामुळे या घटनेवरु तुर्तास तरी पडदा पडलेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments