Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रपराभव झालेल्या 'या' मंत्र्याचा कार्यकर्त्यांना बळ !

पराभव झालेल्या ‘या’ मंत्र्याचा कार्यकर्त्यांना बळ !

minister ram shinde karjat jamkhed assembly constituency
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्याच कर्जत जामखेड बालेकिल्ल्यात, राष्ट्रवादी  कॉंग्रेसच्या रोहित पवार या तरुण उमेदवाराने पराभवाची धुळ चारत नवा इतिहास रचला. त्यानंतर शिंदे यांनी फेसबुक पोस्टवरून कार्यकर्त्यांनी खचून न जाता लढण्याचे बळ दिले.

मतदारसंघात विधानसभेत वाटेला आलेल्या दारूण पराभवामुळे महायुतीच्या गोटात नैराश्याचे वातावरण पसरले आहे. पराभवाने खचलेल्या महायुतीच्या नेते व कार्यकर्त्यांनी नैराश्यग्रस्त होऊ नये यासाठी राम शिंदे यांनी फेसबुक लिहीत पराभवाने खचून न जाता चला तर मग थांबणे मला मान्य नाही असे सांगत कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरण्याचा प्रयत्न केला आहे.

शिंदे फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात…

राम शिंदे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, आयुष्यात अनेक टप्प्यांवर वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जायला लागते तसेच अनेक संघर्षाला तोंड द्यावे लागते. जेव्हा या संघर्षमय प्रवासात आपली माणसं सोबत असतात… समजून घेणारी..समजावून सांगणारी असतात तेव्हा पराभवाची धग नकळत निश्चित कमी होते. आपण सर्व नेहमीच माझ्या वाटचालीत सोबत होतात आणि मला खात्री आहे पुढे ही साथ कायम ठेवाल. या नंतर सुध्दा जेव्हा जेव्हा माझ्या मदतीची, सहयोगाची गरज पडेल तेव्हा तेव्हा मी तेवढ्याच ताकदीने उभा राहील हा माझा शब्द आहे. माझे सामर्थ, माझी निष्ठा आणि प्रेरणा तुम्हीच आहात चला तर मग थांबणे मला मान्य नाही. आपले अखंड परिश्रम असेच सुरू ठेवू या. असे सांगत राम शिंदे यांनी पराभवाने खचून न जाता पुन्हा जनतेच्या सेवेत पुर्ण ताकदीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असाच संदेश आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमांतून कार्यकर्त्यांना लढण्याचे बळ दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments