Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रथंडीत पहिली एसी लोकल धावली

थंडीत पहिली एसी लोकल धावली

मुंबई : नाताळच्या मुहूर्तावर बहुचर्चित एसी लोकलला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. शिक्षणमंत्री विनोद तावडे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, खासदार किरीट सोमय्या यांच्यासह स्थानिक आमदार- खासदार यावेळी उपस्थित होते.

पहिली एसी लोकल बोरीवली स्टेशनहून चर्चगेटसाठी धावली आहे. २५ ते २९ डिसेंबरदरम्यान एसी लोकलच्या फेऱ्या प्रायोगिक तत्वावर करण्यात येणार आहेत. तर १ जानेवारीपासून १२ फेऱ्या दररोज चालवल्या जातील. यातील ८ फेऱ्या फास्ट, ३ सेमी फास्ट तर १ फेरी स्लो असणार आहे. तर देखभालीच्या कामासाठी शनिवार आणि रविवार या दोन दिवशी लोकलला सुट्टी असेल. एसी लोकलची अंतिम चाचणी काल (२४ डिसेंबर) चर्चगेट ते अंधेरी आणि पुन्हा अंधेरी ते चर्चगेट अशा रेल्वे स्थानकांदरम्यान घेण्यात आली होती. भारतीय बनावटीच्या या एसी लोकलचं पहिल्या सहा महिन्यांसाठी किमान तिकीट ६५ रुपये असून, कमाल भाडं २०५ रुपये राहणार आहे. याच जीएसटीचाही समावेश असेल. तसंच या लोकलसाठी आठवड्याचा आणि मासिक पासही उपलब्ध असेल.
मात्र सहा महिन्यानंतर तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता आहे. चढ्या दराबद्दल मुंबईकरांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments